पुणे जिल्हा | वेटलिफ्टिंग स्पर्धेत नेत्राला सुवर्णपदक

लोणी काळभोर, (वार्ताहर) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय युवा, कनिष्ठ व वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट्स अँड फिटनेस सेंटर मधील खेळाडू नेत्रा भागवत थोरात हिने ४० किलो युवा वयोगटामध्ये ४८ किलो स्नॅच व ६२ किलो क्लीन अँड जर्क, असे एकूण ११० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.
खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर, सचिव संतोष सिंहासने उपस्थित होते.
नेत्रा थोरात, प्रशिक्षक गणेश नगीने व अमर गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट्स अँड फिटनेस सेंटर येथे सराव करीत आहे.
अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष हेमंत हाडके, हवेली तालुका वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष योगेश उबाळे, रमेश भोसले, तुषार कुंभार, नरेश गिरी, नामदेव दौंडकर यांनी तिचे अभिनंदन केले.





