अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा ती विदेशात फिरायला जाते. येथील अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ती इंडोनेशियामधील बाली येथे फिरायला गेली आहे. येथील काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर तिने इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र या फोटोमधील तिचा अंदाज अनेकांना आवडलेले नाही. यावरून आता तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या तिचे बाली ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. बालीच्या समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून तिने फोटोसाठी विविध पोझ दिल्या आहेत. या फोटोंना तिने “सनसेट सरफिंग” असं कॅप्शन दिलं आहे. या हॉट लुकने तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर काहींना तिचा हा रुचलेला नाही. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनीकमेंट करत लिहिले की, “मराठी संस्कृतीचं वाटोळं करा”, “मराठी संस्कृतीमध्ये हे चांगले दिसत नाही.” पुन्हा एकदा आता मितालीला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
यापूर्वी देखील मितालीने तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. त्यामुळे देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर आता तिने बिकिनीतील फोटो शेअर केल्याने काही जण तिच्यावर टीका करत आहेत. मात्र त्याआधीच तिने ‘ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका’ असे म्हणत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.