मुंबई – संपूर्ण जगात लोकप्रिय असणाऱ्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एकाच वेळी 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये स्वस्त सब्सक्रिप्शनची योजना नेटफ्लिक्स ने राबवली होती. त्याला भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून याच धर्तीवर कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात सब्सक्रिप्शन दर कमी केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या एंगजमेंटमध्ये 30 टक्के आणि महसूलात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच कंपनीकडून 2021 मध्ये भारतातील सब्सक्रिप्शन दर कमी करण्यात आले होते. नेटफ्लिक्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
“आमच्या जाहिरातीआधारीत सब्सक्रिप्शन प्लॅननंतर ग्राहकांची संख्या अपेक्षेहून अधिक वाढली आहे. आम्ही आमच्या मानक आणि प्रीमियम प्लॅनमधून लक्षणीयरीत्या कमी स्विच केलेले पाहिले आहे. परंतु नेटफ्लिक्सने कोणत्या 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट केली आहे याबद्दलची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
पहिल्या तीन महिन्यांत 17 लाख नवीन यूजर्स जोडले…
नेटफ्लिक्सच्या बऱ्याच काळापासून तोट्यात चाललेल्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला यावेळी फायदा झाल्याची माहिती समोर आली आहे. 2023 च्या पहिल्या तीन महिन्यात यूजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तब्बल 17 लाख नवीन युजर्स जोडले गेले आहे. जानेवारी 2023 ते मार्च 2023 पर्यंत, नेटफ्लिक्सने प्रति शेअर 2.88 डॉलर कमावले आहेत.
या दरम्यान नेटफ्लिक्स चा एकूण महसूल 8.162 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 670 कोटी इतका झाला आहे.तर दुसऱ्या तीन महिन्यात नेटफ्लिक्सची कमाई 8.242 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 676 कोटी एवढी आहे. ‘वॉल स्ट्रीट’च्या मते, दुसऱ्या तिमाहीत नेटफ्लिक्सची कमाई 8.476 अब्ज डॉलर किंवा सुमारे 696 कोटीवर शकते.