नेपाळमध्ये राजकीय संकट : राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही दिला राजीनामा, सकाळीच पंतप्रधान ओलींनी सोडलं होतं पद

Nepal President Ram Chandra Paudel Resigned: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रपति रामचंद्र पौडेल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावरील 26 अॅप्सवर सरकारने घातलेल्या बंदीमुळे संतप्त झालेल्या जनतेचा रोष हिंसक आंदोलनात बदलला असून, यात आतापर्यंत 21हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी काठमांडूसह अनेक भागांत आग प्रकरण आणि तोडफोड सुरू आहे. जेनझेड तरूणाईने हे आंदोलन केले आहे.
सोशल मीडिया बंदीमुळे आंदोलन भडकले –
नेपाल सरकारने नुकतीच 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात जनतेने आंदोलन सुरू केले, पण काही वेळातच हे आंदोलन हिंसक बनले. सरकारने बंदीचा निर्णय मागे घेतला असला, तरी लोकांचा राग शांत झालेला नाही. आंदोलकांनी संसद भवनाला आग लावली, तसेच माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या कार्यालयांवर हल्ले करून तोडफोड आणि आगजनी केली. काठमांडूच्या अनेक भागांत पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमकी सुरू आहेत.
Press Release: Advisory for Nepal⬇️
🔗 https://t.co/KWAzgnJaL1 pic.twitter.com/2pBOSYt6oP— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 9, 2025
भारताची नागरिकांना सावधगिरीची सूचना
नेपाळमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी प्रवास सल्लागार (ट्रॅव्हल अॅडव्हायझरी) जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना सध्याच्या अस्थिर परिस्थितीत नेपाळला प्रवास टाळण्याची सूचना केली आहे. तसेच, नेपाळमध्ये असलेल्या भारतीयांना घराबाहेर न पडण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयाने स्थानिक परिस्थिती सामान्य होईपर्यंत पूर्ण सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.





