नेपाळ विमान अपघात : सिंगापूरमध्ये होणार ब्लॅक बॉक्सची तपासणी

काठमांडु : सिंगापूरचे परिवहन मंत्रालय नेपाळच्या ‘यती एअरलाइन्स’च्या क्रॅश झालेल्या फ्लाइट 691 च्या ब्लॅक बॉक्सची चौकशी करणार आहे. नेपाळच्या तपास अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून सिंगापूरने हा निर्णय घेतला आहे. 15 जानेवारीला पोखरा विमानतळावर उतरताना ‘येती एअरलाइन्स’चे विमान कोसळले होते. या अपघातात विमानातील 72 जणांचा मृत्यू झाला होता.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/indus-waters-treaty-india-issues-fresh-notice-to-pakistan-for-modification-in-water-sharing-deal/
दरम्यान, परिवहन मंत्रालयाच्या (एमओटी) प्रवक्त्याने सांगितले की, एमओटीचे ट्रान्सपोर्ट सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (टीएसआयबी) विमानाच्या फ्लाइट रेकॉर्डरमधून डेटा पुनर्प्राप्त करण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात मदत करेल.
2007 मध्ये स्थापन झालेल्या टीएसआयबीच्या ‘फ्लाइट रेकॉर्डर रीडआउट’ केंद्रावर विश्लेषण केले जाईल. नेपाळी तपास प्राधिकरण तपास आणि निष्कर्षांसह सर्व माहिती नियंत्रित करेल.





