NEPAL on CHINA: ‘आम्हाला त्यांनी हिमनद्यांबाबत अचूक माहिती दिली नाही’ ; चीनवर नेपाळचा गंभीर आरोप
NEPAL on CHINA: नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. 3,000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. चीन आणि नेपाळमध्ये पुराबाबत डेटा शेअर करण्याबाबत मतभेद आहेत.

NEPAL on CHINA: नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. 3,000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. चीन आणि नेपाळमध्ये पुराबाबत डेटा शेअर करण्याबाबत मतभेद आहेत.
मे महिन्यात नेपाळची राजधानी काठमांडू याठिकाणी नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी नेपाळ आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. तीन महिन्यांनंतर, 26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवरील हिमनदी तुटल्याने मोठा पूर आला.
या दुर्घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये आपत्तीशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेपाळ संपूर्ण माहिती न मिळाल्याची तक्रार करत असताना चीनने सर्व गोष्टी वेळेवर शेअर केल्याचं म्हटलं आहे.
नेपाळने ‘ही’ तक्रार केली NEPAL on CHINA:
नेपाळचे म्हणणे आहे की त्यांनी चीनकडे हिमनद्यांची हालचाल, नद्यांच्या पाण्याची पातळी आणि अतिवृष्टीशी संबंधित आवश्यक डेटा मागितला होता, जेणेकरून ते वेळेत तयारी करू शकेल. पण त्याला चीनकडून अपेक्षित तेवढी माहिती मिळाली नाही.
नेपाळच्या जलविज्ञान विभागाचे म्हणणे आहे की चीन केवळ मुसळधार पावसाचा अंदाज पाठवतो, तर नेपाळला दर 10 मिनिटांनी हिमनदी तुटणे, भूस्खलन आणि पाण्याची पातळी याबद्दल अचूक माहिती आवश्यक आहे जेणेकरून लोकांचे प्राण वाचवता येतील. नेपाळला आता भारताप्रमाणे चीनसोबत एक करार करायचा आहे, ज्या अंतर्गत नद्या आणि हवामानाशी संबंधित डेटा सतत आणि वेळोवेळी शेअर केला जातो.
चीनने नेपाळचा दावा फेटाळून लावला NEPAL on CHINA:
चीनने नेपाळचे आरोप फेटाळून लावले आणि आवश्यक माहिती वेळेवर शेअर केल्याचे सांगितले. चिनी दूतावासाच्या म्हणण्यानुसार, हिमालयाचा हा सीमावर्ती भाग अत्यंत दुर्गम आहे, त्यामुळे तेथे देखरेख ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. चीनचे म्हणणे आहे की अपघाताच्या 12 दिवस आधी, त्यांच्या हवामान केंद्राने नेपाळला अतिवृष्टी आणि भूस्खलनासारख्या आपत्तींचा इशारा देणारा ईमेल पाठवला होता.






