Neha Bora : नेहा बोरा यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; पीस बॉंड नोटीसला दिले आव्हान
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा (Neha Bora) यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या १० हजार रुपयांच्या पीस बॉंड नोटीसला आव्हान दिले आहे.

Neha Bora : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा (Neha Bora) यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या १० हजार रुपयांच्या पीस बॉंड नोटीसला आव्हान दिले आहे.
चौकशीदरम्यान शांतता राखण्यासाठी वैयक्तिक हमीपत्र आणि एका जामीनदाराची मागणी करणाऱ्या या नोटीसवर कारवाई होऊ नये, यासाठी त्यांनी न्यायालयाकडे तातडीने दिलासा आणि संरक्षणाची मागणी केली आहे.
नेहा बोरा (Neha Bora) यांनी आपल्या याचिकेत १७ ऑक्टोबर रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १२६ आणि १३० अंतर्गत देण्यात आलेली नोटीस आणि त्यातून उद्भवणारी संपूर्ण कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे.
१६ ऑक्टोबर रोजी मंडी हाऊस येथील घोषणाबाजी, जंतरमंतरवर कलम १६३ लागू असतानाही झालेली निदर्शने आणि कॅनॉट प्लेस येथे आंदोलनासाठी जमावाला भडकवल्याचा आरोप या नोटीसमध्ये त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र बोरा (Neha Bora) यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, दसऱ्याच्या सुट्ट्यांमुळे या आठवड्यात उच्च न्यायालय बंद असले, तरी बोरा याप्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी करण्याची शक्यता आहे.






