पुण्यातील सायकलिस्ट नेहा भावसार हिने तब्बल 11 दिवस सायकल चालवत सेल्फ सपोर्टेड असा साहसी सायकल प्रवास करत शनिवारवाडा ते गोलघुमट, बदामी हंपी या भारताच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज ला भेट देऊन ऐतिहासिक सायकल मोहीम केली. सायकल चालवा आणि प्रदुषण टाळा,पर्यावरण वाचवा असा संदेश देत पुण्यातील सायकलपटू नेहा भावसार हिने तब्बल 11 दिवस सलग पुणे, इंदापूर, सोलापूर, विजयापूर, बदामी, हंपी, हुबळी, बेळगावी अशी 11 दिवसांची ऐतिहासिक साहसी सायकल मोहीम कोकणातल्या धनश्री हिच्याबरोबर मिळून पूर्ण केली. या ऐतिहासिक सायकल एक्सपीडिशन मधून नेहा भावसार हिने सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश देत पुण्यातून शनिवारवाडा इथून मार्गक्रमण केल. शनिवारवाडा इथून फ्लॅगऑफ़ झाल्यावर दररोज तब्बल 100/140 किलोमीटर अंतर सायकल प्रवास कापत कर्नाटक राज्यात प्रवेश केला. सायकलवरच रोज लागणार जवळपास 10 किलोंच सगळा सामान घेऊन हा साहसी प्रवास केला. 2 महिलांची स्वतःच्या स्वतः 11 दिवस कुठलाही आधार न घेता हा सायकल प्रवास करत तब्बल 900 हुन अधिक किलोमीटर अंतर सायकलवर पार करत नारिशक्तीचे उत्तम उदाहरणं दाखवून दिलं. हा खडतर सायकल प्रवास मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कसं लावणारा तरं होताच. पुण्यातून शनिवारवाडा इथून चालू करून पूढे इंदापूर, सोलापूर, विजयापुरा येथील गोलघुमट आणि अनेक ऐतिहासिक स्थळांना सायकलवर भेट देत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीत समाविष्ट असणाऱ्या भारताच्या बदामी गुफा, बदामीमधील अनेक पुरातन वास्तुकला, हंपी येथील वर्ल्ड हेरिटेज लक्ष्मी विठ्ठल मंदिर आणि भारताच्या 50 रुपयांच्या नोटेवर असणारा हेरिटेज रथ तसेच वीरूपाक्ष मंदीर हंपी, विरुपाक्ष मंदिरातलं सगळ्यात मोठ आकर्षण लक्ष्मी हत्तीण. नरसिंह मंदिर, कडेकलाकु गणेश मंदिर हेमकूट हिल मंदिर, कृष्णा मंदिर, बडविलींग मंदिर, हंपी म्युझिअम, क्वीन्स पॅलेस, लोटस महाल, झेनाना एनक्लोजर, एलिफंट स्टबल्स, रंग मंदिर, हजार रामचंद्र मंदिर (१००० मुर्त्यांचे कोरीवकाम आणि रामायणातील आणि इतर अनेक दगडात कोरलेले प्रसंग) काळ्या दगडातील पुष्करणी, महानवमी डिब्बा, क्वीन्स बाथ या आणि अश्या अनेक अद्वितीय कलाकृतींना अद्वितीय कलाकृतीना सायकलवरून भेटी दिल्या आणि सायकलचे आणि या ऐतिहासिक सायकल मोहिमेचे महत्व पटवून दिले. कुठल्याही प्रकारचा सपोर्ट बरोबर नसताना सायकलवर 10 किलो वजन घेऊन नेहा आणि धनश्रीने हा प्रवास करत वाटेत आलेल्या अनेक अडथळ्यांना तोंड दिले. सकाळी कडक्याची थंडी, दिवभर रखरखीत तापेलेले उन्ह आणि रात्रीचा मुक्काम, दिवसभराचा अवघड प्रवास तसेच हायवेवरील प्रचंड मोठी वाहतूक यातून रस्ता काढत स्वतःचा स्वतः या आव्हानावर मात केली. या मोहिमेची कल्पना माझ्या डोक्यात कल्पना आली आणि काय वेगळेपण करता येईल असा विचार करत मी या मोहिमेची तयारी केली. आपल्याबरोबर अजून एक महिला शोधून जगात महिला कुठेच कमी नाहीत आणि ठरवलेल्या कोणत्याही गोष्टी त्या करू शकतात याचे उत्तम उदाहरणं दिल. वाटेत बरेच अडथळे आले काही प्रसंगी धनश्रीची तब्बेतही बिघडली तरीही खचून नं जाता नेहाने हा प्रवास चालू ठेवला. रस्त्यात ऊन काही ठिकाणी प्रचंड वारा तसेच सगळे रस्ते शोधणे, राहण्याची व्यवस्था करणे, भाषेतला बदल समजून त्याप्रमाणे पूढे जाणे संपूर्ण दिवसभर सायकल चालवत ह्या प्रवासाचे हे अंतर कापत राहणे. तसंच काही प्रसंगी सायकल पंक्चर तसेच इतर अनेक शारीरिक आव्हानाना तोंड देत नेहाने धनाश्रीलाही मोटिवेट करत हा 900 किमीचा ऐतिहासिक साहसी सायकल प्रवास पूर्ण केला. या ऐतिहासिक स्थळांना भेट देत इथली संस्कृती सगळी, आचार विचार यांचीही माहिती घेऊन हंपीच्या या भव्य विश्वाला सलाम! आजपर्यंत बघितलेल्या अनेक ठिकांणांपैकी हंपी आणि बदामी सारख्या अद्भुत कलाकृतीची हि भेट दीर्घकाळ समरणात राहील यात काही शंका नाही आपल्या भारताच्या हंपीच्या या वास्तू आणि शिल्पकलेने जगाला दिलेला हा अनमोल ठेवा जतन करणे आणि त्याची काळजी घेणे हे मात्र आपले कर्तव्य आहे असे नेहाने सांगितले. सायकल ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकते असं नेहानी तिच्या आधीच्या पुणे ते कन्याकुमारी, लेड लडाख सायकल मोहीम, खारदूंगला पास, महाराष्ट्रातली अनेक ठिकाण नाशिक, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर तसेचं सायकल मधल्या आव्हानात्मक स्पर्धा 1000 किलोमीटर सलग दिवस रात्र 75 तास सायकलिंग तसेच ब्रम्हगिरी सायकल प्रदक्षिणा अश्या अनेक वेगवेगळ्या सायकल प्रवासातून पटवून दिलं. या प्रवासातील सगळ्या अडथळ्यांवर मात करत नेहाने धनश्रीला घेऊन हा सोलो सेल्फ सपोर्टेड सायकल प्रवास करून स्त्रिशक्तीचे उत्तम उदाहरणं दिले. याआधी आकाशवाणी आणि इतर अनेक प्रसारमध्यमातून नेहाने तिच्याबद्दल सांगितले होतेच आता या नवीन आणि अनोख्या प्रवासासाह तिने आपली एक सशक्त महिला याचे उत्तम उदाहरणं पटवून दिले. सलग 11 दिवस 10 किलो सामान बरोबर घेऊन शारीरिक दृष्ट्या आव्हानत्मक असणारा हा साहसी सायकल प्रवास म्हणजे इतिहासातल्या पानांचा फेरफटकाच.सायकल चालवा पर्यावरण वाचवा. नेहा भावसार पुणे 8806860409