फलटणमधील दहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
Updated On:

फलटण (प्रतिनिधी) – करोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील अतिजोखमीच्या ११ जणांच्या दि. १६ रोजी घेतलेल्या चाचण्यांपैकी १० व्यक्तींच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. १ व्यक्तीचा अहवाल प्रलंबीत आहे.
शुक्रवारी दि. १७ रोजी आणखी एका व्यक्तीची व संस्थात्मक विलगीकरणातील १४ व्यक्तींचा स्त्राव तपासणीसाठी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. याशिवाय तरडगाव येथील एका हवाई प्रवास केलेल्या व्यक्तीचा दुसरा अहवालही आला आहे. निगेटीव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणामध्ये फलटण येथे १४ दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे.





