ऍक्ट्रेस नीतू चंद्राला हॉलीवूडचा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. बॅक डाऊंनची मल्टीस्टार फ्रॅंचायजी असलेल्या नवीन सिनेमात तिला रोल मिळाला आहे. या सिनेमाचे नाव आहे “नेव्हर बॅकडाऊन : रिव्होल्ट’. केली मेडिसिनद्वारे डायरेक्शन होणाऱ्या या सिनेमात अपहरण झालेल्या एका महिलेला केंद्रस्थानी ठेवलेले असेल. नीतू चंद्राला अचानक हॉलीवूडचा सिनेमा मिळाल्याने ती खूपच आनंद झाली आहे.
आपले काम अधिक चोख आणि चांगले करण्याचे फळ कधीतरी निश्चितच मिळते, यावर आपला विश्वास होता. त्यानुसार आपल्याला हवा तसा प्रोजेक्ट मिळाल्याचे तिने सांगितले. या सिनेमासाठी निर्मात्यांना एक अशी हीरोईन हवी होती जिला तायक्वांदो येत असेल. नीतू चंद्रा स्वतः ब्लॅक बेल्ट आहे आणि तिने तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
अर्थातच तिच्यासाठी या हॉलीवुड प्रोजेक्टमध्ये भरपूर ऍक्शन सिक्वेन्स असणार आहेत. नीतू चंद्राने यापूर्वी “गरम मसाला’,”ओय लकी लकी ओय’,”13 बी’,”ट्रॅफिक सिग्नल’ आदी सिनेमांमध्ये काम केले आहे. आता तिच्यासाठी हॉलीवूडचे दरवाजे उघडले गेले आहेत. त्यामुळे अर्थातच बॉलिवूडमधील ब्रॅन्ड व्हॅल्यूही वाढणार आहे, हे निश्चित आहे.