NEET Exam 2026 : नीट युजी २०२६ परीक्षा रद्द करण्याच्या प्रकरणात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. (NEET Exam 2026) दरम्यान नीटची परिक्षा येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. एफएआयएमएने म्हटले आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या कार्यप्रणालीवरील विश्वास आता उडाला आहे. त्यामुळे सध्याच्या गव्हर्निंग बॉडीची पुनर्रचना केली पाहिजे. (NEET Exam 2026) नीट पेपरफुटीचे पाळेमुळे लातूरपर्यंत? नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारने या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर लातूर पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. (NEET Exam 2026) शिकवणी चालकाची चौकशी या प्रकरणी शहरातील एका नामांकित खासगी शिकवणी वर्गाच्या चालकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. मात्र, प्राथमिक चौकशीनंतर त्यांना तात्पुरते सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. (NEET Exam 2026) या प्रकरणात एका पालकाने दिलेल्या तक्रारीनंतर लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले. तपासाची जबाबदारी शहर पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची विविध अंगांनी तपासणी सुरू आहे. (NEET Exam 2026) नीट परीक्षा पार पडल्याच दिवशी शहरातील एका मोठ्या शिकवणी संस्थेच्या चालकाने आपल्या वर्गातील दोन विद्यार्थिनींची मुलाखत घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मुलाखतीत विद्यार्थिनींनी धक्कादायक दावे केले होते. मुलाखतीत विद्यार्थिनींचे धक्कादायक दावे एका विद्यार्थिनीने, सरांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी दिलेल्या गेस पेपरच्या बाहेर परीक्षेत काहीच आले नाही, असे सांगितले होते. तर दुसऱ्या विद्यार्थिनीनेही, दिलेला गेस पेपर जशास तसा उतरला, असे विधान केले होते. (NEET Exam 2026) या वक्तव्यांनंतर नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याची चर्चा राज्यभर रंगू लागली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित शिकवणी चालकास चौकशीसाठी बोलावून घेतले. मात्र, या चौकशीतून नेमके काय निष्कर्ष समोर आले, कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. (NEET Exam 2026)