NEET Paper Leak : नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटला? रोहित पवारांनी थेट पुरावाच दाखवला
NEET Paper Leak : सर्व कागदपत्रांची चौकशी करण्याची रोहित पवारांची मागणी

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन झाले. ज्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यापूर्वी नीट फेरपरीक्षा देखील घेण्यात आला. मात्र याही परीक्षेचा पेपर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी याबद्दल एक पोस्ट करत त्याबद्दलचे पुरावे देखील सादर केले आहेत.
रोहित पवार यांनी पोस्ट करत लिहिले की, “NEET पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे..! तपास यंत्रणानी यासंदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील रॅकेट उघडकीस आणावं, ही विनंती! या पेपरफुटीसंदर्भात पुढं आलेले स्किन शॉट, मेल, संभाषण हे सगळं सोबत दिलेल्या लिंकवर गेल्यास पहावयास मिळेल.
#NEET पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे..!
तपास यंत्रणानी यासंदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील… pic.twitter.com/qFt1NPgsyQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2026
दरम्यान, रोहित पवार यांनी आपल्या ट्विटसोबत काही डॉक्युमेंट्स सुद्धा जोडले आहेत आणि त्यासोबत एक मेल सुद्धा जोडला आहे आणि या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
नीट परीक्षेवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून नव्याने जो कायदा २०२४ मध्ये करण्यात आला होता, त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि तो कायदा संसदेमध्ये मांडण्यात आला असून या कायद्यावर चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, विरोधकांनी सुद्धा केंद्र सरकारला पेपर फुटीवरून घेरलं आहे. मात्र आता फेरपरीक्षेचा सुद्धा पेपर फुटल्याचा दावा करण्यात आल्याने विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





