NEET Paper Leak : देशभर गाजत असलेल्या NEET UG पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून मनीषा संजय हवालदार या महिलेला अटक केली असून, ती या प्रकरणातील 11 वी अटक ठरली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत अटक झालेल्यांमध्ये ‘मनीषा’ नावाच्या तीन महिलांचा समावेश असल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे. (NEET Paper Leak) CBI कडून अटक करण्यात आलेली मनीषा हवालदार ही पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ प्रशाला येथे कार्यरत होती. तिला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG परीक्षा प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तिला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश होता. (NEET Paper Leak) सीबीआयच्या तपासानुसार, मनीषा हवालदारने यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसोबत मिळून भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते. तपास यंत्रणांनी हे प्रश्न तपासले असता, तेच प्रश्न NEET परीक्षेत आल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. (NEET Paper Leak) NEET परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीचे प्रकरण उघड झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या CBI कडून केला जात आहे. (NEET Paper Leak) दरम्यान, सीबीआयने देशभरातील विविध शहरांमध्ये छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बँक स्टेटमेंट्स जप्त केले आहेत. तपासादरम्यान लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या दलालांचाही पर्दाफाश झाला असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. (NEET Paper Leak) NEET पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले आरोपी महाराष्ट्रातून अटक मनीषा हवालदार शिवराज मोटेगावकर प्रल्हाद कुलकर्णी मनीषा मांढरे मनीषा वाघमारे शुभम खैरनार धनंजय लोखंडे इतर राज्यांमधून अटक दिनेश बिवाल मांगीलाल बिवाल विकास बिवाल यश यादव या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.