डीपफेक व्हिडिओंवर नियंत्रणाची गरज: माझेही बनावट व्हिडिओ फिरत आहेत – निर्मला सीतारामन

Updated On:
डीपफेक व्हिडिओंवर नियंत्रणाची गरज: माझेही बनावट व्हिडिओ फिरत आहेत – निर्मला सीतारामन

मुंबई  – बनावट व्हिडिओ म्हणजे डीपफेक व्हिडिओचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे नागरिकांची आणि विविध क्षेत्रातील ग्राहकांची दिशाभूल होत आहे. याला आळा घालण्याची गरज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की माझे स्वतःचे अनेक डीप फेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर पसरले आहेत. ही चिंतेच बाब आहे.

वार्षिक जागतिक वित्तीय तंत्रज्ञान महोत्सवात बोलताना सीतारामन यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वित्तीय क्षेत्रात, प्रशासनात आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये वेगवान बदल होत आहेत. मात्र याचा दुरुपयोगही तितकाच होत आहे. हा दुरुपयोग टाळण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांनी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवे तंत्रज्ञान वेगाने विकसित होण्याची गरज आहे कारण सध्या अनेकांचे नुकसान होत आहे. ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यासाठी केला जातो, त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांची दिशाभूल केले जाते. याला शक्य तितक्या लवकर आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

या अगोदर सायबर क्राईम विविध यंत्रणामध्ये आक्रमण करून माहिती चोरत असत. आता वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांचे डीप फेक व्हिडिओ प्रसारित करून समाजामध्ये सायबर गुन्हेगार अशांतता, अविश्वास पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हे गुन्हेगार आवाजाचा, छायाचित्राचा, व्हिडिओचा सर्रास दुरुपयोग करून नागरिकांच्या मनावर परिणाम करीत आहेत. शेअर बाजार नियंत्रक सेबी डीप फेक व्हिडिओला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतर सर्व क्षेत्रांनी सांघीकपणे या प्रश्नाचा मुकाबला करावा असे सीतारामन म्हणाल्या.

आणखी संबंधित बातम्या

Fertilizer imports : अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका; खत आयात महागली, सरकार देणार मोठी मदत

2026-10-05 21:24:21

Fertilizer imports : अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका; खत आयात महागली, सरकार देणार मोठी मदत

Nirmala Sitharaman: निर्मला सीतारमण यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी ; चंद्राबाबू नायडूंचा जयराम रमेशांना पलटवार

2026-10-05 11:59:46

Nirmala Sitharaman: निर्मला सीतारमण यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी ; चंद्राबाबू नायडूंचा जयराम रमेशांना पलटवार

No UPI Day : 2 ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द! अर्थमंत्र्यांच्या भेटीनंतर व्यापाऱ्यांचा विरोध मागे

2026-09-30 21:18:41

No UPI Day : 2 ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द! अर्थमंत्र्यांच्या भेटीनंतर व्यापाऱ्यांचा विरोध मागे

Nirmala Sitharaman : सीतारामन यांच्या परदेशी मंत्र्यांसोबत महत्त्वाच्या बैठका; गुंतवणुकीसह व्यापारवाढीवर चर्चा

2026-09-29 21:29:55

Nirmala Sitharaman : सीतारामन यांच्या परदेशी मंत्र्यांसोबत महत्त्वाच्या बैठका; गुंतवणुकीसह व्यापारवाढीवर चर्चा

Repo Rate : ऑक्टोबरमध्ये कर्जाचा EMI वाढणार? RBI गव्हर्नरांची अर्थमंत्र्यांशी भेट; आता निर्णयाकडे लक्ष

2026-09-14 22:36:18

Repo Rate : ऑक्टोबरमध्ये कर्जाचा EMI वाढणार? RBI गव्हर्नरांची अर्थमंत्र्यांशी भेट; आता निर्णयाकडे लक्ष