आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पार पडला. या सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करत पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने भारताला दिलेले २४२ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 42.3 षटकात पूर्ण केले. या विजयासह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 20 धावा, शुभमन गिलने 46, विराट कोहलीने 100, श्रेयस अय्यरने 56, हार्दिकने 8 धावा केल्या. यामुळे भारताचा विजय सुकर झाला. भारत या मैदानावर अजूनही अपराजित आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत ७ सामने खेळले. या सगळ्या सामन्यात भारताने आतापर्यंत विजय मिळवला आहे. त्यापूर्वी पाकिस्तानच्या डावाची सुरुवात काही निराशाजनक झाली. पाकिस्तानचे ओपनर इमाम उल हक आणि बाबर आझम यांची लवकर विकेट पडली. यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी मोठी पार्टनरशिप केली. त्यांच्या या पार्टनरशिपच्या जोरावर पाकिस्तानने ४९.४ ओव्हरमध्ये २४१ धावा केल्या. यामध्ये सौद शकील याने सार्वधिक ६२, रिझवानने ४६ आणि कुशदिल शहाने ३८ धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना काही विशेष कामगिरी करता आलेली नाही.