Bihar Elections 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत. सध्या मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सकाळी १० वाजेपर्यंत १४७ जागांसाठी कल जाहीर केले आहेत. त्यापैकी एनडीए १६० जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी भाजपा ६८ जागांवर, जेडीयू ७६ जागांवर, लोक जनशक्ती पार्टी १३ जागांवर, काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे. आरजेडी ५० जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. बहुमताचा आकडा १२२ आहे. दरम्यान, बिहारमध्ये काँग्रेसची वाईट स्थिती झाल्याचे यावरुन दिसत आहे. मतांची चोरी हा मुद्दा यावेळी अपयशी ठरत असल्याचे म्हंटले जात आहे. बिहारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचा आज फैसला होणार आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झालं होतं, पहिल्या टप्प्यात 65 तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 69.90 टक्के मतदान झालं त्यामुळे नितीश कुमार पुन्हा येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्ता स्थापणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.