राष्ट्रवादीचा मोर्चा “भाजपा हटाव’चा नारा

पिंपरी -महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज (दि. 18) भाजपाविरोधात रणशिंग फुंकले. नवनियुक्त अध्यक्षांच्या नेतृत्त्वाखाली मोठे शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या मोर्चात “भाजपा हटाव’चा नारा देण्यात आला. महापालिकेवर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शुक्रवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजता चिंचवड स्टेशन येथून मोर्चाला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी शहराध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, राहुल भोसले, नगरसेविका मंगला कदम, वैशाली काळभोर, डॉ. वैशाली घोडेकर, जगदिश शेट्टी, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विराज लांडे, अतिश बारणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, महापालिकेचे स्थायी समिती सभापती व माजी उपमहापौराला अटक होणे, ही शहराच्या दृष्टीने शरमेची बाब आहे. त्यामुळे शहराची मोठी बदनामी झाली आहे. भाजपच्या कारभाराने महापालिकेची भ्रष्टाचारी महापालिका अशी ओळख निर्माण झाल्याने शहराचीही प्रतिमा मलिन झाली आहे. महापालिकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असणे आवश्यक आहे. त्याकरिता महापालिका निवडणुकीत भाजपच्या भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, भ्रष्टाचारी भाजपाच्या विरोधात आज सगळे जमले आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्तेवरून
नसबंदीत गैरव्यवहार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा – योगेश बहल
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्र्यांच्या नसबंदीत गैरव्यवहार करत पैसे खाल्ले आहेत. शहरातील 17 हजार भटक्या कत्र्यांची नसबंदी करणे शिल्लक असताना हा आकडा 71 हजार दाखवून, नसबंदीसाठी साडे सहा कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. अनधिकृत फ्लेक्सच्या भंगारातही या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. फलक काढल्यानंतर त्याचे जमा झालेले लोखंडी खांब, वस्तू भाजप सरचिटणीसाने जमा केल्या नाहीत. पॅरा मेडिकल भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला असून आहे. बोगस कागदपत्रांद्वारे निविदा लाटणाऱ्या ठेकेदारांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याने त्याबाबत पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील जनता कंटाळली येत्या निवडणुकीत भाजपची सत्ता घालवून मतदानाच्या रुपातून त्यांची नसबंदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल म्हणाले.



