केजरीवालांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले “आपण हिंदू देवांना…”

Updated On:

मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली. भारतीय चलनांमध्ये येणाऱ्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती आणि लक्ष्मीचाही फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाची फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर आता याप्रकरणी अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेत्यांनी तर नोटांवर फोटो छापण्यासाठी काही पर्यायही देखील सुचवले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, लवकरच गुजरात राज्याच्या निवडणुका आहेत. आम आदमी पक्ष तिथे निवडणूक लढवत आहे. आपण हिंदू देवांना मानतो हे सांगण्यासाठी कदाचित गणपती आणि लक्ष्मी देवीचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी त्यांनी केली असेल.

पुढे ते म्हणाले की, महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवर आहे त्याला जगात मान्यता आहे. आता सर्वचजण देवदेवतांचे, महापुरुषांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी करत आहे. यामुळे कारण नसताना वाद निर्माण होईल. त्यामुळे आता जे आहे तेच सुरू असायला हवे असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

आणखी संबंधित बातम्या

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Congress : वारं फिरलं! काॅंग्रेसमध्ये इनकमिंग सुरू; थेट राष्ट्रीय प्रवक्त्यांचा प्रवेश सोहळा

2026-10-03 16:11:48

Congress : वारं फिरलं! काॅंग्रेसमध्ये इनकमिंग सुरू; थेट राष्ट्रीय प्रवक्त्यांचा प्रवेश सोहळा

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

Ashutosh Ranka: आशुतोष रांका यांनी अरविंद केजरीवालांच्या 'आप'ला दिली देणगी ; पक्षाकडून 'हा' मोठा खुलासा

2026-09-29 10:50:16

Ashutosh Ranka: आशुतोष रांका यांनी अरविंद केजरीवालांच्या 'आप'ला दिली देणगी ; पक्षाकडून 'हा' मोठा खुलासा

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा

2026-09-27 17:28:54

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा