Pune District : दौंडमध्ये २२ ते २८ जुलैदरम्यान राष्ट्रवादीचा जनसेवा सप्ताह; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Pune District : नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दोरगे यांनी केले आहे.

यवत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दौंड तालुक्यात २२ ते २८ जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने तालुकाभर विविध सामाजिक, आरोग्य व जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दोरगे यांनी केले आहे.
जनसेवा सप्ताहात तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप, स्वच्छता मोहीम, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, पशुवैद्यकीय सेवा शिबिरे तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
राहू, वरवंड, पाटस, केडगाव, बोरीपार्धी, गोपाळवाडी, यवत, खामगाव, देऊळगावराजे आदी भागांत स्थानिक लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे उपक्रम पार पडणार आहेत. पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या सहकार्याने सभापती अमोल नलावडे यांच्या मार्गदर्शनाखालीही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जनसेवा सप्ताहाचे आयोजन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे आणि तुषार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, महिला तालुकाध्यक्ष ज्योती झुरुंगे, सागर फडके, मयूर चौधरी, सोनाली कुल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत असून, नागरिकांनी जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





