शरद पवारांना मोठा दिलासा ! निवडणूक आयोगाने ‘या’ गोष्टीला दिली परवानगी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता देत पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं होतं.
शरद पवारांना मोठा दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारण्याचा अधिकार पक्षाला देण्यात आला आहे. निवडणूक आयोगासमोर आज झाली सुनावणी झाली असताना हा निर्णय देण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांनी मानले आभार
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज आमच्या दिल्लीत 4 केसेस होत्या. 3 केस सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात एक केस होती. ज्याप्रकारे पक्ष आणि चिन्ह पक्षाचे संस्थापक असणाऱ्या शरद पवारांकडून काढून घेण्यात आलं होतं. पण मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनवपूर्वक आभार मानते. जरी शरद पवारांवर अन्याय झाला असला, तर जनतेने त्याची नोंद घेतली. मतांच्या रुपाने शरद पवारांना आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला साथ दिली. आम्ही त्याबद्दल त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. मनपूर्वक आभार मानतो,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.





