भाजप एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा वापर करत आहे : शरद पवार

मुंबई – सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सतत आरोप केलं जात आहे. त्यांच्या घरावर पाच छापे मारुन काय साद्य केलं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस आधिकारी आता आहेत कुठं?

शांततेत रस्त्यावरुन जाणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं गेलं. लखीमपूरमध्ये जे घडले ते आतापर्यंत कधीच घडले नव्हते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर मौन बाळगलं, साधे दु:खही व्यक्त केलं नाही. याप्रकरणी सत्ताधारी पक्षाने भूमिका घेणं गरजेचं होतं. अशी खंत लखीमपूर येथील घडलेल्या घटनेवर पवार यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय यंत्रणेपेक्षा मुंबई पोलिसांनी आधिक ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीपेक्षा मुंबई पोलिस आधिक कार्यक्षम आहेत. कुणी शंका घेऊ नये, अशी मुंबई पोलिसांची कारवाई असते. असे मुंबई पोलिसांवर पवार यांनी भाष्य केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.