राष्ट्रवादीने व्यंकय्या नायडूंना पाठवले ‘जय भवानी जय शिवाजी’ लिहिलेली पोस्टकार्ड

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज नवी मुंबई येथील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ लिहिलेली पोस्ट कार्ड पाठवण्यात आली. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणाही युवक पदाधिकाऱ्यांनी दिल्या. युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पोस्ट कार्डस पाठवण्यात आले.
राज्यसभेचा नवनिर्वाचित सदस्य म्हणून उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. पण, अशा कोणत्याही प्रकारच्या घोषणा सदनात चालत नाही, हे यापुढे लक्षात ठेवा, असा समज व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना दिली.
त्यामुळे राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षांनी व्यंकय्या नायडू यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे राम मंदिर बांधून कोरोना जाणार?, असे वक्तव्य केल्यामुळे शरद पवारांना भाजपकडून ‘जय श्रीराम’ लिहलेले कार्ड पाठवण्यात येत आहेत दुसरीकडे व्यंकय्या नायडू ‘जय भवानी जय शिवाजी’ लिहिलेली पोस्ट कार्डस पाठवण्यात येत आहेत.





