राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल 

कोल्हापूर – कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मुश्रीफ यांनी प्रशासनाकडे चौकशी करावी अन्यथा उपोषण करीन असा इशारा दिला आहे. 30 मार्च रोजी बानगे येथे हसन मुश्रीफ एका खाजगी घरामध्ये बसल्याबद्दल त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कोणताही पुरावा उपलब्ध नसताना निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी लेखी निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केला आहे. चुकीच्या पद्धतीने नोंद झालेला गुन्हा तात्काळ रद्द करावा अन्यथा निवडणूक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.