NCP Merger : मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राज्याच्या राजकीय पटलावर व्यापक बदल घडण्याची चिन्हे आहेत. त्यातून दोन स्वतंत्र पक्षांमध्ये विभागलेल्या मूळच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकीकरण अटळ मानले जात आहे. त्याविषयीची घोषणा फेब्रुवारीच्या मध्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकार प्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादींच्या स्तरावर महत्वाचे फेरबदल अपरिहार्य बनले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांवेळीच दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या जवळ आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्वत: अजित पवार दोन्ही पक्षांच्या एकीकरणासाठी आग्रही होते. त्यासंदर्भात काही बैठकाही झाल्या, अशी माहिती त्या पक्षांच्या गोटातून पुढे येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सव्वा तास बैठक चालली असून आता बैठक संपली आहे. कालही रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली होती. Sharad and Ajit Pawar अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधानामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, उपमुख्यमंत्री कोण होणार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षकडे पद कुणाला मिळणार तसेच अजित पवार यांच्याकडे असलेली खाती कुणाकडे जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आम्हाला लवकरत लवकर निर्णय घ्यायचा आहे, याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे विधान केले आहे.