राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे मुंबईला रवाना ? भाजपमध्ये करणार प्रवेश; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेला शपतविधी आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि शिंदे गटावर असलेली अपात्रतेची टांगती तलवार यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांबाबतचे एक ट्विट केले होते. यानंतर लवकरच अजित पवार भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहे.
अशात आता अजित पवार यांच्या नजीकचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर नॉट रिचेबल म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. दरम्यान धनंजय मुंडे हे काल संभाजीनगरला जाऊन आलेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यसह धनंजय मुंडेही भाजप पक्षात प्रवेश करणार की नाही अशा चर्चा रंगल्या आहे. धनंजय मुंडे तडका फडकी मुंबईला का रवाना झाले असा सवालही चर्चेत आला आहे. त्यातच धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या राजकीय घडामोडीचे गूढ आणखी वाढले आहे. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





