Supriya Sule – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित लढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुंबईत युतीबाबत आम्ही पुढील आठवड्यात काँग्रेसशी बोलणार आहे. आम्हाला सर्वांना सोबत घ्यायचे आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक युती असू शकते. पुढील आठवड्यात अधिक स्पष्ट चित्र समोर येईल, असे त्या म्हणाल्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी एकटे जाण्याची घोषणा करणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या नैसर्गिक मित्रपक्षासोबत युती करण्याबाबत चर्चा केली होती. काँग्रेस मुंबई महानगरपालिका निवडणुक समान विचारसरणीच्या पक्षांसोबत लढावणार असल्याचे न्यांनी स्पष्ट केले होते.