मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे.
Mumbai: Actor Arjun Rampal’s girlfriend Gabriella Demetriades summoned by Narcotics Control Bureau (NCB) on 11th November.
NCB conducted raid at the premises of Arjun Rampal today & summoned him on 11th November to join the investigation, in connection with a drug-related case.
— ANI (@ANI) November 9, 2020
दरम्यान, या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता ‘अर्जुन रामपाल’ याच्या देखील राहत्या घरी आज एनसीबीने छापा टाकला आहे. तर यातच अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सला एनसीबीने समन्स बजावलं आहे. ११ नोव्हेंबर रोजी तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह, साराअली खान आणि दीपिका पदुकोण यांची देखील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. तर दुसरीकडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.