मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता ‘अर्जुन रामपाल’ याच्या देखील राहत्या घरी आज एनसीबीने छापा टाकला आहे.
Narcotics Control Bureau conducts raid at the premises of actor Arjun Rampal in Mumbai
(file pic) pic.twitter.com/QZGj900hNb— ANI (@ANI) November 9, 2020
एनसीबीकडून शनिवारी रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते आहे. बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून रविवारी मुंबईतील अंधेरी, खारघरसह पाच परिसरांत छापे टाकण्यात आले.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह, साराअली खान आणि दीपिका पदुकोण यांची देखील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. तर दुसरीकडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.