‘लेडी सुपरस्टार’ने चित्रपटातील भूमिकेसाठी घेतला मोठा निर्णय, अभिनेत्री चक्क 1 महिन्यापासून करतेय उपवास

Actress Nayanthara | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराला ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाते. नयनताराच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. अभिनेत्री चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी संपूर्ण समर्पण देताना पाहायला मिळते. आता ती लवकरच ‘मुकुथी अम्मन 2’ चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी नयनतारा मागील 1 महिन्यापासून उपवास करत आहे.
वर्ष 2020 मध्ये नयनताराची प्रमुख भूमिका असलेला ‘मुकुथी अम्मन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. आता या सिनेमाचा सिक्वल मोठ्या पडद्यावर येत आहे. नुकतेच चित्रपटाची मुहूर्त पूजा पार पडली. यावेळी नयनातारा देखील उपस्थित होते.
चित्रपटाच्या मुहूर्त पुजावेळी बोलताना नयनताराने तिच्या भूमिकेबद्दल सांगितले. ‘ही भूमिका साकारणे फक्त अभिनयापुरते मर्यादित नाही, तर ही एक भावना आहे.’, असे ती म्हणाली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सी दिग्दर्शक यांनी नयनतारा मागील 1 महिन्यापासून उपवास करत असल्याचे सांगितले. देवी मुकुथी अम्मन यांच्या प्रती असलेल्या श्रद्धेसाठी नयनातारा उपवास करत आहे. मुकुथी अम्मनच्या पहिल्या भागाच्यावेळीही तिने उपवास केला होता.
दरम्यान, ‘मुकुथी अम्मन 2’ च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट यावर्षीच्या अखेरपर्यंत मोठ्या पडद्यावर रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपटात नयनतारासोबतच खुशबू, मीणा, रवी, मोहन आणि विजय हे कलाकार देखील आहे. ‘मुकुथी अम्मन’ हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झाला होता. आता 5 वर्षांनी याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


