छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवादी ठार; जवान जखमी

रायपूर – छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यामध्ये आज नक्षलवादी आणि विशेष कृती दलामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक नक्षलवादी ठार झाला तर “एसटीएफ’चा एक जवान जखमी झाला. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यामध्ये आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान झाले. याच कालावधीमध्ये दुपारी 4.20 वाजता नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केल्यामुळे ही चकमक झाली. ओर्छा भागात जंगलत असलेल्या हेलिपॅड जवळ नक्षलवाद्यांनी गस्त पथकावर हल्ला केला होता, असे नक्षल विरोधी कारवाईचे उपमहासंचालक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

मतदानात नक्षलवाद्यांकडून अडथळा येऊ नये म्हणून “एसटीएफ’च्या कर्मचाऱ्यांच्या गस्त पथकाकडून गस्त घातली जात होती. तेंव्हा नक्षलवाद्यांनी या पथकावर जोरदार गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे चकमक सुरू झाली. लवकरच नक्षलवाद्यांनी पलायन केले. या चकमकीत एक सुरक्षा रक्षक जखमी झाला. नंतरच्या शोधमोहिमेदरम्यान एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तुल, चाकू आणि अन्य नक्षली साहित्य आढळून आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.