सुट्टीवर आलेल्या जवानाची नक्षलवाद्यांकडून हत्या
Updated On:

विजापूर – छत्तीसगड मधील नक्षलवाद्यांनी स्पेशल टास्क फोर्सच्या एका जवानाचा तो वैद्यकीय कारणासाठी सुटी घेऊन घरी आला असताना हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. हा जवान छत्तीसगड राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावात उपचार घेत होता त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्याला तेथे जाऊन ठार केले.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा रेड्डी रोड परिसरात घडली. या जवानाचा गळा दाबून खून करण्यापूर्वी त्याला जबर मारहाण करण्यात आली होती.या शहीद एसटीएफ जवानाचे नाव अर्जुन कुडियम असे असून तो गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा गावचा रहिवासी आहे.तो एक महिन्याच्या रजेवर आला होता. माओवाद्यांच्या गंगलूर एरिया कमिटीच्या सदस्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारणारी काही पत्रके त्या परिसरात टाकली आहेत.
टॅग्स:





