Naxalites killed। आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगल परिसरात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. राज्य गुप्तचर विभागाचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) महेश चंद्र लड्ढा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही कारवाई मंगळवारी सकाळी सुरू झाली होती आणि बुधवारीही परिसरात स्पॉट चकमक झाली. ठार झालेल्यांमध्ये आंध्र-ओडिशा सीमा (AOB) झोनचा महत्त्वाचा तांत्रिक तज्ज्ञ मेतुरी जोगाराव ऊर्फ शंकर (श्रीकाकुलम) याचाही समावेश असल्याची प्राथमिक ओळख पटली आहे. शंकर हा AOB एरिया कमिटी मेंबर (ACM) होता आणि नक्षलवाद्यांचे शस्त्रास्त्र तयार करणे, संचार यंत्रणा हाताळणे व तांत्रिक नेटवर्क उभारण्यात तो माहिर मानला जात होता.मागील ४८ तासांत १३ नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत. जपाटून अटक मोहीम Naxalites killed। ५० हून अधिक नक्षलवादी जेरबंद हिडमा गटाच्या मृत्यूनंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राज्यभर छापेमारी केली. एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा आणि एलुरू जिल्ह्यांतून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त नक्षलवादी अटक करण्यात आले आहेत. यात केंद्रीय कमिटी, राज्य कमिटी, एरिया कमिटी सदस्य आणि प्लॅटून लेव्हलचे कमांडर यांचा प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “छत्तीसगडहून नक्षलवादी आंध्र-ओडिशा सीमेवर नवे तळ उभारण्याचा आणि स्थानिक कॅडर पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणा सतत नजर ठेवून होत्या. संयुक्त पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली असून, आपल्या जवानांना कसलाही अपाय झालेला नाही.” असे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमेवर माओवादी हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शंकर हा शस्त्रे तयार करण्यात, संप्रेषण प्रणाली चालवण्यात आणि तांत्रिक नेटवर्क्स चालवण्यात तज्ज्ञ होता. सुरक्षा एजन्सींच्या मते, एओबी झोनमध्ये नक्षलवाद्यांच्या तांत्रिक क्षमता बळकट करण्यासाठी हा कॅडर जबाबदार होता. गेल्या काही महिन्यांपासून आंध्र-ओडिशा प्रदेशात माओवादी कारवाया वाढत असताना ही चकमक घडली आहे. नक्षलवादी जंगलात नवीन तळ स्थापन करत आहेत आणि स्थानिक कॅडरना सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे, संयुक्त दलांनी मंगळवारी शोध मोहीम सुरू केली. Naxalites killed।