सुरक्षा दलाचा नक्षलवाद्यांवर मोठा हल्ला ; छत्तीसगड-तेलंगण सीमेवर चकमकीत ७ नक्षलवादी ठार

Naxal Encounter in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर सरकारचा हल्ला सुरूच आहे. या अनुषंगाने रविवारी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड-तेलंगणा सीमा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना ठार केले.
समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ग्रेहाऊंडचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चालपाका जंगल परिसरात ही चकमक झाली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये माओवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पोलीस फरार साथीदारांच्या शोधात व्यस्त Naxal Encounter in Chhattisgarh |
सुरक्षा दलाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दल इथुरुनाग्राममधील चालपाकाजवळील जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आमच्या जवानांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल 7 नक्षलवादी गोळ्या घालून ठार झाले. जवानांचे पथक अजूनही परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत.
मृतांची नावे काय? Naxal Encounter in Chhattisgarh |
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या चकमकीत ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. यामध्ये कुर्सम मंगू, एगोलाप्पू मल्लैया, मुसाकी देवल, मुसाकी जमुना, जय सिंग, किशोर आणि कामेश यांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी त्यांच्या ताब्यातून अनेक आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत.
2026 पर्यंत ते पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट
या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजधानी रायपूरमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात सतत मोहीम चालवण्याबाबत बोलले होते. 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्याचे लक्ष्य त्यांनी दिले होते. त्या संदर्भात छत्तीसगड पोलिस सातत्याने मोहीम राबवत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत 96 चकमकी झाल्या आहेत. त्यापैकी 8.84 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या 207 नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.





