निवडणूक ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला ; ३ जवान जखमी

नागपूर: १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान घेण्यात आले. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश होता. गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाछया आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.

आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स देखील तैनात केली होती मात्र मतदानावरून परतत असताना गडचिरोली आणि एटापल्ली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये ३ जवान जखमी झाले झाले असल्याने पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना गालबोट लागले.

नक्षलवाद्यांनी मतदान संपल्यानंतर हल्ला केला यामध्ये सी सिक्सटी कमांडो पथकाचे तीन जवान जखमी झाले. हि घटना एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरात घडली. बेस कॅम्पवर परतणाऱ्या नक्षलविरोधी सी सिक्सटी कमांडो पथकाला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.