मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आले. मात्र, नवाब मलिक हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नवाब मलिका यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.