एकच नंबर! प्रत्येक 2 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स देणार ‘ही’ कंपनी, स्टॉकची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी

Share Market | गेल्याकाही महिन्यांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. असे असले तरीही काही कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. याशिवाय, गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड आणि बोनस शेअर्स देखील देत आहेत. यापैकीच एक कंपनी आहे नवकार अर्बन स्ट्रक्चर लिमिटेड. सध्या ही कंपनी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटमुळे चर्चेत आहे.
नवाकार अर्बन स्ट्रक्चर लिमिटेडने (Navkar Urbanstructure) बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनी 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवरील एका शेअरवर 3 शेअर बोनस स्वरुपात देणार आहे. म्हणजेच, ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांना 2 शेअर्सवर 3 शेअर्स बोनस दिले जातील. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच, बोनस शेअर्ससाठी कंपनीने 21 मार्च रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
बोनस शेअर्ससोबतच कंपनी स्टॉक स्प्लिट करणार आहे. 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यू असलेले शेअर्स 2 भागात विभागले जातील. यामुळे कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 1 रुपये प्रति शेअर होईल. याआधी कंपनीच्या शेअर्सचे विभाजन वर्ष 2022 मध्ये झाले होते. त्यावेळी कंपनीचे शेअर्स 5 भागात विभागले गेले होते.
नवकार अर्बन स्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर मागील काही वर्षात शेअर्सची किंमत स्थिर राहिली आहे. सध्या शेअर्सची किंमत 16.20 रुपये एवढी आहे. कंपनीची मार्केट कॅप 367.15 कोटी रुपये आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





