यशश्री शिंदेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती

नवी मुंबई : नवी मुंबई येथे 20 वर्षीय तरुणीच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे असे 20 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. हि तरुणी गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचा तपास केला असता तो यशश्री शिंदेचा असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. शवविच्छेदन करतेवेळी पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले होते. अखेर आता यशश्रीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.
काय आहे रिपोर्टमध्ये?
तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथम दर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा असे दिसत आहे. 2019 मध्ये याच संशयित आरोपीवर ह्याच मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन तो जवळपास 6 महिने तुरुंगात होता. त्यानंतर तो बाहेर आल्यावर पुन्हा त्याने हिच्यासोबत जवळीक केली. तिला मारून टाकल्यावर तिच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्या काही प्राण्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडले असल्याचे समोर आले आहे.
कशी पटली मृतदेहाची ओळख ?
पोलिसांनी सांगितले की, बेवारस मृतदेह मिळाल्यानंतर यशश्री शिंदेच्या पालकांना बोलवण्यात आले. त्यांनी तिच्या कपड्यांवरून आणि कमरेवरील टॅटूवरून तिची ओळख पटवली. या वेळी यशश्रीच्या पालकांनी दाऊद शेख नावाच्या संशयिताचे नाव सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार टीम रवाना केल्या आहेत. आरोपी लवकरच आमच्या ताब्यात असेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.





