नवी दिल्ली- ओडिशाचे मुख्यमंत्रिपद गेली 19 वर्षे भूषविणारे ‘नवीन पटनायक’ सलग पाचव्यांदा मुखमंत्री पदाचे दावेदार ठरले असून, ते 29 मे रोजी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. नवीन पटनाईक हे ओडिशामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. लोकसभेबरोबरच ओडिशा विधानसभेची देखील निवडणूक पार पडली आहे. देशात सर्वत्र मोदी नावाची चर्चा असताना सुद्धा ओडिशात नवीन पटनाईक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
Naveen Patnaik to be sworn-in as Odisha CM on May 29
Read @ANI Story | https://t.co/bJQ3pDyV55 pic.twitter.com/qOyfk99Vn4
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2019
मोदींच्या लाटेतही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीचा अधिकृत निवडणुक निकाल लागला असून बीजेडीने 112 जागेवर विजय मिळून पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखून दिले आहे.