कोकण किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळाचा धुमाकूळ 

मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज धडकणार आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधूस होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी किनारपट्टीवरील भागात वीज पुरवठाही खंडीत केला जाणार आहे.

– दापोली येथील काही इमारतींवरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले आहेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही.


– निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एनडीआरएफची ४३ पथकं तैनात करण्यात आली आहेत. यापैकी महाराष्ट्रात २१ पथकं असून, जवळपास १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ही माहिती दिली.

– कोकण किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळाचा धुमाकूळ

– अखेर निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकले असून, त्याचा प्रकोप पुढील तीन तास मुंबई, रायगड, रत्नागिरी या कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना जाणवणार आहे.  या सर्व प्रदेशातील जनतेनं घरीच व सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन केलं आहे.

– निसर्ग चक्रीवादळ अलिबागमध्ये धडकले

– अलिबागमध्ये 12000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी जवळपास 800 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

– निसर्ग चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली परिसरात बसायला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं झाडं उन्मळून पडत आहेत. रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे

– दुपारी 1 ते संध्याकाळी 4 दरम्यान निसर्ग चक्रीवादळ अलिबाग, हरिहरेश्वरकडून पुढे सरकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

– मुख्यमंत्री कार्यालयाने सुरक्षित राहण्यासाठी ‘काय करावे व काय करू नये’ याची यादी प्रसिद्ध केली आहे.

– असा सुरु आहे निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास

– रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.

– चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या वादळ अलिबागपासून १३० किमी दूर असून, वाऱ्याचा वेग १०० ते ११० किमी प्रतितास इतका होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

– रत्नागिरीत वाऱ्याची गती वाढली आहे. सकाळी वाऱ्याचा वेग प्रतितास ५५ ते ६५ किमी इतका होता. कोकण किनारपट्टीवर येईपर्यंत वादळाचा वेग ७५ किमी प्रतितास इतका होणार आहे.

– रायगडमध्ये ११ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं.

Leave A Reply

Your email address will not be published.