Nani Movie : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील असे काही कलाकार आहेत ज्यांच्या चित्रपटांची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत असतात. त्यापैकी एक नॅचरस स्टार नानी. या अभिनेत्याचा नवीन चित्रपट येणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचते. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून नानी दरवेळी काहीतरी हटके प्रेक्षकांसमोर सादर करत असतो. आता तो पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द पॅराडाईज असे चित्रपटाचे नाव असून या बहुप्रतिक्षेत चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून, या पोस्टरमधून नानाचा खतरनाक लूक लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. अभिनेता नानीने त्याच्या चाहत्यांसाठी नवीन वर्षात नवीन चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरून शेअर केले आहे. या पोस्टरमधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचे दमदार पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टरवरून हे स्पष्ट होते की हा चित्रपट एक भव्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेमॅटिक अनुभव देणारा असणारा आहे. View this post on Instagram A post shared by The Paradise (@theparadisemovie) “२०२६ मध्ये आपले स्वागत आहे, म्हणजेच जादाल जमाना. हैप्पी न्यू ईयर. #TheParadise 26 असे कॅप्शन पोस्टरला देण्यात आले आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड़, अशा एकूण आठ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. नानीच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा त्याचा सर्वात मोठा चित्रपट असून भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील रिलीज केला जाणार आहे. एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली द पॅराडाईज चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपटाची व्याप्ती पाहता तो केवळ एक चित्रपट राहिला नाही तर एक अनोखा अनुभव असल्याचे म्हटले जात आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपट मोठ्या स्केलवर तयार करण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे नानीची धमाकेदार एन्ट्री मोठ्या पदड्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाचे जागतिक आकर्षण वाढवण्यासाठी निर्माते हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्सच्या या चित्रपटाच्या संपर्कात असल्याचेही म्हटले जात आहे. हेही वाचा : “टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटतो, म्हणून…”; सचिन पिळगांवकरांनी ट्रोलिंगवर सोडलं मौन