राष्ट्रीय क्रीडा कबड्डी स्पर्धा: किरण, हरजित कौरकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

पुणे – गोवा येथील मल्टीपर्पज इनडोअर स्टेडियम येथे दिनांक 4 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आपले दोन्ही संघ जाहीर केले. किरण मगर याच्याकडे पुरुष संघाची तर हरजित कौर संधू हिच्याकडे महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.
पुरुषांचा संघ दादा आव्हाड तर महिलांचा संघ राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सराव करीत आहे. गत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले दोन्ही उपविजेते ठरले होते. गुजरात येथे झालेल्या 36 व्या नॅशनल गेम्समध्ये पुरुष व महिला संघाने द्वितीय क्रमांक मिळविला होता, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी दिली आहे.
पुरुष संघ – 1) किरण मगर (कर्णधार), 2) आदित्य शिंदे, 3)राम अडागळे, 4) मयूर कदम, 5) असलम इनामदार, 6)आकाश शिंदे, 7) शेखर तटकरे, 8) आरकम शेख, 9) तेजस पाटील, 10) सिद्धेश पिंगळे, 11)अक्षय भोईर, 12)शंकर गदई. प्रशिक्षक – दादा आव्हाड. महिला संघ – 1) हरजित कौर संधू (कर्णधार), 2) पौर्णिमा जेधे, 3) रेखा सावंत, 4)पूजा शेलार, 5)अंकिता जगताप, 6)पूजा यादव, 7)सलोनी गजमल, 8) पूजा पाटील, 9) सायली जाधव ,10) प्रतीक्षा तांडेल, 11)अपेक्षा टाकळे, 12)सिद्धी चाळके. प्रशिक्षक – राजेश पाडावे, व्यवस्थापक – सुजाता समगीर.





