पणजी : गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने बीच हँडबॉल क्रीडा प्रकारातील अखेरच्या साखळी सामन्यात केरळविरुद्ध ९-११, १०-१३ असा निसटता पराभव पत्करला. परंतु तरीही उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. हा सामना बुधवारी होईल. महाराष्ट्राकडून बिना कडकुंभर्गे आणि स्वप्नजा मुरबाडे यांनी अप्रतिम खेळ केला.
महाराष्ट्र 200 पार…
History in the making!🙌
Maharashtra proudly reaches a remarkable milestone of 200 medals in the 37th National Games.
This extraordinary achievement is a testament to the hard work and dedication of our incredible athletes. 🥇🥈🥉@AjitPawarSpeaks @Nat_Games_Goa @BansodeSpeaks pic.twitter.com/YzSEOwGiwy— Maharashtra Olympic Association (@MahaOlympic) November 7, 2023
दरम्यान, नुकताच महाराष्ट्राने 37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 200 पदकांचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. ही विलक्षण कामगिरी आमच्या अतुलनीय खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा पुरावा आहे, असं महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशननं म्हटलं आहे.