Nasrapur Case : नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकणातील (Nasrapur Case) पिडीतेच्या घरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि.4) सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी कुटूंबियांचे सांत्वन करत नराधम आरोपीला फाशी मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कधीही माझ्याशी काही बोलायचे असेल (Nasrapur Case) तर मला सांगा मी तुमच्या घरी येईल असे आश्र्वस्त केले. यावेळी आयुक्तांचे देखील डोळे पाणावले. भोर तालुक्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक महाराष्ट्र दिनी घडली. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या साडेतीन वर्षीय चिमुरडीवर भिमराव कांबळे या ६५ वर्षीय नराधमाने ‘वासरू दाखवतो’ असे म्हणत गोठ्याकडे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा खून केला. या घटनेचे तीव्र पडसाद पुणे जिल्ह्यासह राज्यात उमटले. नागरिकांकडून आरोपी नराधमाला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी होत आहे. Amitesh Kumar या घटनेच्या पार्श्र्वभूमीवर शनिवारी (दि. २) संतप्त नागरिकांनी नवले पूल परिसरात साडेचार तास आंदोलन (Nasrapur Case) केले होते. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडितेच्या वडिलांना तुमच्या मागण्या आम्ही नक्की पूर्ण करू असे मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिले होते. दरम्यान, सोमवारी पोलिस आयुक्तांनी पीडितेच्या आई-वडिलांना धीर देत, या प्रकरणासाठी लवकरच विषेश सरकारी वकील नियुक्त केला जाईल असेही सांगितले.