मुंबई – बॉलीवूड जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह नेहमीच सामाजिक मुद्यावर सोशल माध्यमांमध्ये आपले मत मांडत असतात. मनोरंजन असो वा लेखन असो किंवा मग काव्यवाचन नसिरुद्दीन शाह यांचं काम मौलाच काम आहे. यातच नुकतीच त्यांची धर्मावर आधारित कविता सोशल वर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांचा हा व्हिडियो खुद्द कवी, शायर हुसैन हैदरी यांनी पोस्ट केलं आहे.
Naseeruddin Shah saahab reciting my poem, Hindustani Musalmaan, for @IWF_Writers.
(1/2) pic.twitter.com/UkuKUYUaxg
— Hussain Haidry (@hussainhaidry) December 29, 2020
दरम्यान , मै हिंदुस्तानी मुसलमां हूँ…, असे बोल असणारी ही कविता थेट मनाचा ठाव घेत आहे. हैदरी यांनी ही कविता सर्वप्रथम 2017 मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात सादर केली होती. त्यांचाही व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला होता.