बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये केला ‘हा’ उल्लेख
Updated On:

नाशिक- आपल्या पोटच्या बाळाची हत्या करून नंतर आईने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या महिलेने हे टोकाचं पाऊल का उचललं असावं हे अद्याप कळू शकले ऩाही. मात्र आत्महत्ये पुर्वी एक सुसाईड नोट मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.





