नाशिक | राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

Updated On:
नाशिक | राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच कुशावर्त येथे देखील पुजा करून दर्शन घेतले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसर उपस्थित होते. यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली.

त्याआधी नाशिक गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर शासकीय विश्रामगृहात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन झाल्यावर त्यांना शहर पोलीस दलाच्यावतीने सलामी देण्यात आली. यानंतर नाशिक शासकीय विश्रामगृह येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अल्प विश्रांतीनंतर मुंबईकडे प्रयाण केले.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

2026-10-03 18:09:53

Rahul Salunkhe : संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखेंवर गंभीर गुन्हा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

2026-09-25 13:48:18

Girish Mahajan: गणेश विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ढोल वादनाचा ठेका

Accident News : धक्कादायक ! त्र्यंबकेश्वरवरून परतताना भाविकांच्या कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

2026-09-16 17:14:19

Accident News : धक्कादायक ! त्र्यंबकेश्वरवरून परतताना भाविकांच्या कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी

2026-09-15 15:35:19

ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी

NASHIK : आदिवासी विद्यार्थ्यांचे 13 दिवसांचे उपोषण अखेर मागे; 3 अधिकाऱ्यांचे निलंबन, कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

2026-09-04 21:48:39

NASHIK : आदिवासी विद्यार्थ्यांचे 13 दिवसांचे उपोषण अखेर मागे; 3 अधिकाऱ्यांचे निलंबन, कुटुंबीयांना 5 लाखांची मदत