Nashik Earthquake : उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढत असतानाच नाशिकच्या (Nashik Earthquake) सीमावर्ती सुरगाणा तालुक्यात निसर्गाच्या एका वेगळ्याच कोपाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण आणि आसपासच्या परिसरात भूकंपाच्या (Nashik Earthquake) सौम्य धक्क्यांची मालिका सुरू असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा आणि गोंडाळविहीर यांसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागांत भूगर्भातील या हालचालींचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या धक्क्यामुळे घरांवरील छताचे पत्रे वाजू लागले आणि स्वयंपाकघरातील भांडी कोसळत आहे. तसेच जमीन हादरल्याने नागरिक सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडत आहे.