Nashik Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू

नाशिक : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारकडून समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. हे उद्घाटन होऊन 3 आठवडे देखील झाले नाही तोच याच ठिकाणी अपघाताची मालिका सुरु झाली आहे. शहापूर हद्दीत नाशिकमधील सुप्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांच्या मर्सिडीज गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
कसा घडला अपघात?
उद्योजक सुनील हेकरे हे मुंबईहून नाशिकला येत असताना त्यांच्या मर्सिडीज गाडीला अपघात झाला. अपघातात सुनील हेकरे यांची दोन मुले आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून नाशिकला जात असताना इगतपुरी बोगद्यापासून जवळच असलेल्या शहापूर हद्दीत उद्योजक सुनील हेकरे यांचा मर्सिडीज गाडीवरील ताबा सुटल्याने कार दुभाजक तोडून पलीकडे गेली आणि हा भीषण अपघात झाला.
समृद्धीवरील अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटर रस्त्याचे उद्घाटन होऊन तीन आठवडेही झालेले नसताना रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.





