मालदिवमध्ये नशीद यांना पुन्हा प्रचंड बहुमत

माले (मालदिव)- मालदिवमध्ये हकालपट्टी करण्यात आलेले माजी अध्यक्ष मोहमद नशीद यांच्या मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टीला नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पुन्हा एकदा प्रचंड बहुमत प्राप्त होण्याचे प्राथमिक निकालावरून स्पष्ट झाले आहे. नशीद यांच्या पक्षाला दोनतृतीयांशपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंतच्या जाहीर निकालांनुसार नशीद यांच्या एमडीपीला 87 पैकी 50 जागांवर आघाडी मिलाली आहे. काही खासगी वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार नशीद यांच्या पक्षाला 68 जागांवर विजय मिळतो आहे. मालदिवमध्ये नवी पहाट उगवते आहे, असे नशीद यांनी म्हटले आहे.

नशीद यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि हुकुमशहा अब्दुल्ला यमीन यांना भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरून गेल्या वर्षी पायउतार व्हायला लागले होते. त्यांच्या 5 वर्षांच्या राजवटीनंतर मालदिवमध्ये प्रथमच झालेल्या निवडणूकीत हा सत्ताबदल होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नशीद यांना 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मोहमद सोलिह यांनी अनपेक्षितपणे विजय मिळवल्यानंतर नशीद मालदिवमध्ये परतले होते.

अब्दुल्ला यमीन यांनी लागू केलेली अध्यक्षीय पद्धत रद्द करून लोकशाही पद्धत लागू केली जाईल, असे आश्‍वासन नशीद यांनी दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.