NASA : नासाच्या (NASA) आगामी चांद्रमोहिमेसाठी चार अंतराळवीर सज्ज झाले असून नासाच्या अर्ध्या शतकापुर्वीच्या ऐतिहासिक अपोलो मोहिमेशी साधर्म्य असलेल्या या मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. या आर्टिमिस मोहिमेसाठी (NASA) मिलिटरी टेस्ट पायलट म्हणून अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला आणि कॅनडाच्या एका अंतराळवीराचा समावेश असणार आहे. चंद्राच्या कक्षेमध्ये अंतराळ स्थानक सुरू करण्याची योजना नासाने रद्द केली असून आता त्या ऐवजी आता चंद्राच्या पृष्ठभागावरच तळ उभारण्याची योजना आखली जाते आहे. याची पुर्वतयारी म्हणून आता १० दिवसांची मोहिम आखली गेली आहे. या मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत. किंवा चंद्राच्या कक्षेमध्येही जाणार नाहीत. NASA त्याऐवजी अंतराळात हजारो किलोमीटर खोलपर्यंत प्रवास करून परत येणार आहेत. अपोलो अंतराळवीरांनी जी कक्षा ओलांडली नव्हती, त्याच्या पुढे जाण्याची ही योजना म्हणजे भविष्यातील चांद्रमोहिमेच्या लॅन्डिंगचा प्राथमिक टप्पा असणार आहे. या मोहिमेसाठी (NASA) निवड झालेले चारही अंतराळवीर फ्लोरिडातील केनेडी अंतराळ स्थानकात आज दाखल झाले. पुढील आठवड्यात बुधवारी या अंतराळवीरांना घेऊन आर्टिमिस २ अवकाशात उड्डाण करणार आहे. रेड वाईसमन यांच्या नेतृत्वाखाली हे चौघांचे पथक या मोहिमेत सहभागी होणार आहे. वाईसमन यांच्या व्यतिरिक्त, या चमूमध्ये नासाचे व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच, तसेच कॅनडाचे जेरेमी हॅन्सेन यांचा समावेश आहे.